विलगीकरणात असलेला शरत कमल म्हणतो टोकियो ऑलिम्पिक स्थगित व्हायला हवे

ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेप्रमाणेच जगातील खेळाडूंचे जीवही तितकेच महत्वाचे आहेत.मी मस्कतवरून मस्कत ओपन टेबल टेनिस स्पर्धा खेळून मायदेशी परतल्यावर दक्षताना म्हणून घरातच क्वारंटाईनं झालोय.जगात जीवघेण्या कोरोनाची महामारी थैमान घालत असताना जपानच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळणे म्हणजे क्रीडापटूंच्या जीवावरच खेळच होणार आहे. त्यापेक्षा हे ऑलिम्पिक काही काळ स्थगित करणेच शहाणपणाचे ठरेल असे परखड मत हिंदुस्थानचा स्टार टेबल टेनिसपटू शरत कमल यांने व्यक्त केले आहे.

शरतसाठी टोकियो ऑलिम्पिक ही मोठी पर्वणीच आहे. पण त्यासोबत जपानमध्ये खेळताना भयानक कोरोनाची टांगती तलवारही डोक्यावर सतत असेल. त्याने सुमारे 10 वर्षांच्या परिश्रमानंतर मस्कत ओपन टेबल टेनिस स्पर्धेचा ‘किताब जिंकण्याचा पराक्रम केला आहे.पण मायदेशी परतताच त्याला कोरोनाच्या भीतीने घरातच विलगीकरणाचे कटू अनुभव पचवायला लागले आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विजेतेपदाचा त्याचा आनंद क्षणभंगुरच ठरला आहे. आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाने ऑलिम्पिक चाचणी स्पर्धांसह सर्वच आंतरराष्ट्रीय स्पर्धा एप्रिल महिन्यापर्यंत स्थगित केल्या आहेत. त्यामुळे सर्वच क्रीडा प्रकारांवर कोरोनाचे गडद सावट असल्याचे स्पष्ट झाले आहे.

खेळाडू म्हणून मला ऑलिम्पिक व्हावेसे वाटतेय पण…
एका आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून मलाही टोकियो ऑलिम्पिक वेळेत पार पडावे असे वाटत आहे. पण कोरोनाचे केंद्रस्थान चीनमधून आता इराण आणि इटली या देशांत हलले आहे. अशा दडपणाखाली ते कधी कोणत्या देशात जाईल याचा भरवसा नाही. या भीतीपोटीच हे ऑलिम्पिक खेळाडूंचा जीव धोक्यात घालून खेळण्यापेक्षा कोरोनावर जगाने नियंत्रण मिळवल्यावर खेळवणेच योग्य ठरेल असे आता मलाही वाटायला लागली आहे. येत काही महिन्यांचा काळ अशा मेगा स्पर्धा खेळवण्यास योग्य नाही असे माझे स्पष्ट मत बनलंय, असे शेवटी शरत म्हणाला.

आपली प्रतिक्रिया द्या