Lok Sabha 2019 भाजपचे ‘शत्रू’ काँग्रेसच्या गोटात, गुरूवारी पक्ष प्रवेशाची शक्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
काँग्रेसचे शत्रुघ्न सिन्हा पाटणा साहीब मतदारसंघातून निवडणूक लढवत असून ते 74 हजार मतांनी पिछाडीवर आहेत

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

भाजपचे खासदार आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा हे काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता आहे. भाजपने बिहारमधून त्यांचे तिकीट कापल्यानंतर ते महागठबंधनमध्ये सामील होतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. त्यात सिन्हा यांनी मंगळवारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची मुक्त कंठाने प्रशंसा केली. त्यानंतर ते बिहारच्या महागठबंधनमध्ये सामील होणार नाही हे निश्चित झाले.

राहुल गांधी गरीबांना वर्षाला ७२ हजार रुपये देण्याचे जाहीरनाम्यात म्हटले होते. त्यावर सिन्हा यांनी हे मौकेपे चौका असल्याचे म्हटले होते. त्यावर भाजपने केलेल्या टीकेचा सिन्हा यांनी समाचार घेतला. आप करे तो रासलीला और हम करे तो कॅरेक्टर ढीला अशे म्हणून त्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. काँग्रेस प्रवेशानंतर त्यांना पटना साहिबमधून उमेदवारी मिळू शकते.