तिने जपानचा बचाव करण्याचे स्वप्न पाहिले. तिच्या सहकारी सैनिकांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रिना गोनोई एक ज्युडोपटू  आहे. एक माजी सैनिक म्हणून, ज्युडो अभ्यासक म्हणून आणि एक महिला म्हणून ज्यांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले त्यांना कायद्याच्या कक्षेत आणण्यासाठी सर्व महिलांच्यावतीने ती लढा देत आहे. जेव्हा गोनोईने जपानच्या सेल्फ-डिफेन्स फोर्स (JSDF) मध्ये रुजू झाली  तेव्हा तिने एक वर्षापेक्षा जास्त काळ दररोज शारीरिक आणि शाब्दिक लैंगिक अत्याचार सहन केले आणि दोन वर्षांच्या सेवेनंतर जून 2022 मध्ये तिने दल सोडले तेव्हा तिने स्वत:वरील अत्याचारांना वाचा फोडण्याची  शपथ घेतली. सुरुवातीला तिच्यावर कोणीच  विश्वास ठेवण्यास तयार नव्हते. जेव्हा तिने तिच्या वरिष्ठांकडे  कथित गैरवर्तनाची तक्रार केली तेव्हा कुठे  दोन अधिकाऱ्यांची चौकशी सुरु झाली  परंतु पुराव्याअभावी दोघांनाही सोडून देण्यात  आले. हताश होऊन  तिने टीव्ही स्टेशन गाठले. जेव्हा त्यांनी तिच्याकडे दुर्लक्ष केले, तेव्हा तिने तिची लढाई सोशल मीडियावर नेली.

गोनोईने शांत होण्यास नकार दिल्याने अखेरीस JSDF मधील लैंगिक छळाची व्यापक चौकशी सुरू झाली आणि  तपास पुन्हा सुरु झाला. ज्यामध्ये असे आढळून आले की तिने  2020 आणि ऑगस्ट 2021 दरम्यान दररोज शारीरिक आणि शाब्दिक लैंगिक अत्याचार झाला होता. शेवटी  जपानच्या संरक्षण मंत्रालयाकडून जाहीर माफी मागितली गेली, कारण ग्राउंड सेल्फ-डिफेन्स फोर्स चीफ ऑफ स्टाफ योशिहिदे योशिदा यांनी  नतमस्तक होऊन असे म्हटले: “ग्राउंड सेल्फ-डिफेन्स फोर्सेसच्या वतीने, मी  गोनोई यांच्याकडे  मनापासून दिलगिरी व्यक्त करू इच्छितो, ज्यांनी जपानी लष्करात दीर्घकाळ त्रास सहन केला आहे.. मला माफ करा.” पण गोनोईच्या दृष्टीने  हे पुरेसे नाही आणि ती आता न्यायालयात फौजदारी आणि दिवाणी दोन्ही प्रकरणांचा पाठपुरावा करत आहे.