नेटकऱ्यांनी अभिनेत्रीला विचारले गुड न्यूज आहे का? तिने दिले भन्नाट उत्तर

काँटा लगा फेम अभिनेत्री शेफाली जरीवाला ही बिग बॉसच्या 13 व्या सिझनमध्ये झळकल्यानंतर बऱ्याच वर्षांनी चर्चेत आली. या सिझनमध्ये शेफाली वाईल्ड कार्ड एन्ट्री होती मात्र नंतर तिने चांगला खेळ करत शेवटच्या सातात स्थान मिळवले होते. बिग बॉस नंतर शेफाली पुन्हा एकदा चर्चेत आली असून यावेळेस तिला नेटकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नामुळे ती प्रकाशझोतात आली आहे.

शेफालीने तिचा नवरा अभिनेता पराग त्यागी सोबत एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोवर नेटकऱ्यांनी शेफालीला गुड न्यूज आहे का असं विचारले. नेटकऱ्यांनकडून विचारल्या जाणाऱ्या या प्रश्नाला शेफालीने मजेशीर रित्या घेत त्यावर भन्नाट उत्तर दिले आहे. शेफालीने त्या प्रश्नावर उत्तर देताना सांगितले की , गुड न्यूज नाही खरंतर जास्त जेवलेय’. तिच्या या मजेशीर उत्तराने अनेक नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे.

shefali-jariwala-reply1

शेफाली व पराग त्यागी यांचे 2014 मध्ये लग्न झाले आहे. लवकरच शेफाली व पराग हे छोटीशी मुलगी दत्तक घेणार आहे. शेफालीने बिग बॉसच्या घरात देखील याबाबत सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या