
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
शेमारू एंटरटेन्मेंट हे तब्बल पाच दशकांपासून घराघरांत पोचलेले नाव आहे. हा ब्रँड म्हणजे हिंदुस्थानी घरांमध्ये केवळ सिनेमा पोचवणारे नाव नव्हते, तर असंख्य हिंदुस्थानी कुटुंबांना एकत्रितपणे अविस्मरणीय आठवणींचा ठेवा देणारा हा ब्रँड होता. शेमारू म्हणजेच बॉलिवुड असं समीकरणही बनून गेलं होतं आणि त्याच्या फार चांगल्या आठवणीही अस्तित्वात आहेत! हिंदुस्थानीय एमअँडई उद्योगक्षेत्रातील डिजिटल संधींमध्ये शेमारूने एक विकासमार्ग आखला आहे आणि आपल्या प्रवासाच्या नव्या टप्प्याला सुरुवात केली आहे. शेमारू एंटरटेन्मेंटचे सीईओ हिरेन गाडा आणि संयुक्त व्यवस्थापकीय संचालक अतुल मारू यांनी ओगिल्वी इंडियाचे सीईओ कुणाल जेसवानी यांच्यासह जगासमोर नव्या ब्रँडची ओळख सादर केली.
शेमारूने आपल्या प्रेक्षकांना नेहमीच ताजा आणि खिळवून ठेवणारा कंटेट दिला आहे. परंतु आजची अत्याधुनिक पिढी आधीपेक्षा जरा वेगळी आहे. यंदा नव्या ब्रँडची ओळख करण्यासाठीच्या मंडळावर ऑगिल्वी इंडिया या जगातील अग्रणीच्या क्रिएटिव एजन्सीचा समावेश करून घेण्यात आला आहे. ब्रँड नेमका काय आहे, ग्राहकाधार कसा आहे आणि एकूण व्यवसायाबद्दल जाणून घेतल्यानंतर नवा लोगो तयार करण्यात आला. काळजीपूर्वक योजना आखणे, विशेष संशोधन आणि नव्याने येणारे ट्रेंड समजून घेणे या सर्वांतून नवे डिझाइन साकारले आहे आणि ते प्रेक्षकांना नक्की आवडेल असेच झाले आहे.
नवे डिजिटल युग आणि आपल्या देशाची चैतन्यमयी संस्कृती यांच्या योग्य समीकरणाने ब्रँडच्या नव्या ओळखीचा लोगो तयार झाला आहे. संपन्न हिंदुस्थान देशातील रंगांचा आपल्या लोगोमध्ये समावेश करत, आपल्या विविध प्रेक्षकाधाराला विस्तारीत श्रेणीतील उत्तम दर्जाचा हिंदुस्थानीय कंटेट देण्याचे वचन शेमारू देत आहे. डिझाइनमधील आकारांत डिजिटल प्ले बटणाचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय कंपनीने `इंडिया खुश हुआ’ ही नवी टॅगलाइनही जाहीर केली आहे. आमच्या वैविध्यपूर्ण प्रकारांतून लोकांच्या जीवनात आम्ही आनंद भरत आहोत, असा संदेश यातून दिला जात आहे.





























































