ओबीसीत समावेश केला तरच मराठा आरक्षण शक्य- प्रा. शेषराव मोरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, नांदेड

मराठा समाजाच्या आरक्षणावरून राज्यात रान पेटवले जात असतानाच मराठा समाजाचा इतर मागासवर्गीयांत समावेश केला म्हणजेच 27 टक्क्यांमध्ये सामावून घेतले तरच मराठा समाजाला आरक्षण मिळू शकेल, असे ठाम मत प्रा. शेषराव मोरे यांनी आज रविवारी येथे मांडले.

प्रा. अमृत देशमुख यांच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळय़ात प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. मोरे बोलत होते. ते पुढे म्हणाले, आरक्षणाच्या मुद्दय़ावर प्रा. अमृत देशमुख यांच्याशी मी अनेकदा चर्चा केली आहे. त्यांचेदेखील मत माझ्याप्रमाणेच आहे. सद्यस्थिती पाहता मागासवर्गीय आयोगाने मराठा समाज मागासलेला आहे, असा अहवाल दिला तरी त्या समाजास द्यावयाच्या आरक्षण टक्केवारीवर वाद होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात आरक्षणाची टक्केवारी 50 टक्क्यांच्या वर जाऊ देता येणार नाही आणि हे सर्वोच्च न्यायालयातही टिकणार नाही, असे स्पष्ट मत प्रा. मोरे यांनी व्यक्त केले.

summery- sheshrao more spoke about maratha reservation