पनवेलमधील शेकाप कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

उरण विधानसभा मतदारसंघातील पनवेल तालुक्यातील लाडीवली गावातील शेतकरी कामगार पक्षाचे पुरोगामी युवक संघटनेचे तालुका उपाध्यक्ष प्रमोद गोळे यांनी आमदार तथा शिवसेना जिल्ह्यप्रमुख मनोहर भोईर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत कैलास मालुसरे, मिनेश पनसे, कल्पेश पाटील, प्रदीप राऊत, प्रदीप कलेकर, मनोहर शिर्के, प्रतीक राऊत, राहुल पवार, गोविंद कार्लेकर, सागर कालेकर आदी अनेक कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी आमदार मनोहर भोईर यांनी कार्यकर्त्यांना शिवबंधन बांधून त्यांचे स्वागत केले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

आपली प्रतिक्रिया द्या