
विधू विनोद चोप्रा निर्मित शिकारा या चित्रपटाचा दुसरा ट्रेल प्रदर्शित झाला आहे. कश्मीरी पंडितांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.
1990 साली कश्मीरमधून मोठ्या प्रमाणात कश्मीरी पंडितांना हुसकावण्यात आला. तब्बल 4 लाख कश्मीरी पंडित आपल्या घराला पारखे झाले होते. त्यावर आधारित विधू विनोद चोप्रा यानी शिकारा या चित्रपटाची निर्मिती केली आहे. कुछ बरसोंसे टूट गया हूं खंडित हूं, वादी तेरा बेटा हूं मै पंडित हू अशा कवितेच्या आधारे कश्मीरी पंडितांची वेदना या ट्रेलरमध्ये दिसत आहे. 7 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मूळचा कश्मीरचा असलेला आदिल खान आणि सादिया मुख्य भुमिकेत आहेत.
























































