शिल्पा शेट्टीने धुडकावली 10 कोटींची ऑफर!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेत्री शिल्पा शेट्टी मोठय़ा पडद्यापासून दूर असली तरी छोटय़ा पडद्यावरील ‘सुपर डान्सर’ या शोच्या माध्यमातून ती चाहत्यांशी कनेक्ट आहे. आपल्या फिटनेसमुळेदेखील ती नेहमी चर्चेत असते. अलिकडेच तिला एका जाहिरातीसाठी तब्बल 10 कोटी रुपयांची ऑफर मिळाली होती. परंतु शिल्पाने ही जाहिरात करण्यास नकार दिला आहे.

ही एका स्लिमिंग पिल्स म्हणजेच वजन कमी करण्यासाठी घेतल्या जाणाऱया गोळ्यांची जाहिरात होती. मात्र अशा कुठल्याही गोळ्यांची जाहिरात न करण्याचा निर्णय शिल्पाने घेतला आहे. वजन कमी करण्यासाठी घेतल्या जाणाऱया गोळ्यांचा तुमच्या शरीरावर विपरित परिणाम होऊ शकतो. या गोळ्या कायम डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घेतल्या जाव्यात, असा सल्ला वैद्यकीय तज्ञ देतात. म्हणूनच शिल्पाने ही जाहिरात नाकारली आहे. या निर्णयाबद्दल तिचे सोशल मीडियावर काwतुक होत आहे.