
कोकणात शिमगोत्सवाला प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यात 1315 ठिकाणी सार्वजनिक तर 2854 खाजगी होळ्या उभारण्यात येणार आहेत. ग्रामदेवतेच्या पालख्यांना रूपे लावण्यात येणार आहे. ग्रामदेवतेच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी चाकरमानी मोठ्या संख्येने गावी येतात. जोरदार फाका देत आजपासून होम पेटवायला सुरूवात झाली आहे. जिल्ह्यात 1399 पालख्या सजणार आहेत.
आज रविवारी फाक पंचमीपासून कोकणात शिमगोत्सवाला धुमधडाक्यात प्रारंभ झाला आहे.हुरा रे हुरा आमच्या भैरीबुवाला सोन्याचा तुरा रे होलियो अशा फाका देत शिमगा साजरा केला जाणार आहे.कोकणात शिमगा सुरू झाला असून आज गावागावात होळ्या उभ्या करण्यात आल्या.ग्रामदेवतेच्या पालख्या प्रदक्षिणेसाठी मंदिराबाहेर पडतात.यावेळी ग्रामस्थ हात भेटीचा नारळ, ओटी भरतात.खांद्यावर,डोक्यावर घेऊन पालखी नाचवली जाते.शिमग्याच्या निमित्ताने संपूर्ण गाव एकत्र येतो.



























































