शिर्डी बदनंतर मराठा समाजाच्या वतीने विविध आंदोलने

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ राहाता तालुका सकल समाजाने शिर्डी येथे सुरु केलेल्या मराठा आरक्षण साखळी उपोषणास शिर्डीतील बहुजन समाज बांधवांनी जाहीर पाठिंबा दिला. तेली, तांबोळी, साळी, माळी, मुस्लिम, आदिवासी, महार, न्हावी, मातंग, धनगर, वंजारी, परदेशी अशा विविध जातीधर्मातील बांधवांच्या भेटीने शिवरायांच्या इतिहासाचा आणि साईबाबांच्या “सबका मालिक एक” ह्या संदेशाचा अभिमान वाटतो.त्याचं पालन शिर्डीत होतं.

राजकीय नेत्यांना गावबंदी नंतर आता गावबंदची हाक देत मराठा आरक्षणाचा लढा तीव्र. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सकल मराठा समाजाकडून बंदची हाक. शिर्डी शहरासह, राहाता तालुक्यात लोणी बुद्रुक व लोणी खुर्दसह मराठा आरक्षणाला पाठिंबा देत गावात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. साई मंदिरातील दर्शन व्यवस्था मात्र नियमितपणे सुरू आहे. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी साईबाबा संस्थानच्या आस्थापना देखील सुरू आहे. सचिन चौगुले, अनिल बोठे, रवी गोंदकर, कानिफ गुंजाळ, नितीन अशोक कोते, प्रकाश गोंदकर, प्रशांत राहणे आमरण उपोषणास बसले आहेत.

महसूलमंत्री विखे पाटलांच्या मतदारसंघात मराठा समाज आक्रमक.मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह प्रधानमंत्र्यांच्या फोटोला काळे फासले. एसटी बसवरील जाहिरातीच्या फोटोला काळे फासले आहे .शिर्डी मतदारसंघातील राहाता तालुक्यात मराठा तरुण उतरले रस्त्यावर मराठा समाजाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. मराठा समाजाविषयी अपशब्द वापरल्याने नारायण राणे यांचा निषेध करण्यात आला, कोंबडीच्या गळ्यात नारायण राणे यांचे पोस्टर लावून घोषणाबाजी देण्यात आली.

शिर्डीत सकल मराठा समाजाच्या वतीने गाढवांच्या गळ्यात गुणरत्ने सदावर्ते यांचे फोटो लटकवून निषेध करण्यात आलाय. सदावर्ते यांचे फोटो लटकवलेल्या गाढवांवांची शिर्डी शहरातून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. सदावर्ते मराठा समाजाबद्दल घेत असलेल्या भूमिकेचा आणि वक्तव्यांचा सकल मराठा समाजाने निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली. राहात्यातील वकील संघटनेचा पाठिंबा, संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या वतीने एडवोकेट सुवर्णा मोहिते यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू ठेवावं, कुणीही आत्महत्या करू नये, जाळपोळ तोडफोड करून आंदोलनाची दिशा भरकटणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचना केल्या.