शिर्डीत यंदा गुरुपौर्णिमा उत्सव नाही

693
shirdi-trust

श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या वतीने शनिवार दि. 4 ते 6 जुलै या कालावधीत साजरा करण्यात येणारा गुरुपौर्णिमा उत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त उत्सवाच्या मुख्य दिवशी 5 जुलै रोजी श्री साईआश्रम येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे, अशी माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली आहे. या कालावधीत कोणतेही सांस्पृतिक कार्यक्रम होणार नाहीत. ‘श्रीं’चा रथ आणि पालखी मिरवणूक कार्यक्रम रद्द करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या