‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या महिलेचा खून; तरुणाला अटक

‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱया महिलेने दुसऱया मुलीशी लग्नाला विरोध केला. त्यामुळे झालेल्या वादावादीतून प्रियकराने प्रेयसीचा चाकूने भोसकून खून केला. यानंतर तो स्वतः शिर्डी पोलीस ठाण्यात हजर झाला. ही घटना आज (रविवारी) दुपारी घडली.

अजय म्हस्के (रा. राम सोमय्यानगर, सावळीविहीर) असे अटक झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर सविता सुनील बत्तीशे (वय 25, रा. शिर्डी) असे मृत महिलेचे नाव आहे.

सविता बत्तीशे ही पती व दोन मुलांना सोडून अजय म्हस्के याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. अजयचे आई-वडील त्याचे लग्न करण्यासाठी दुसरी मुलगी पाहत होते. मात्र, मयत सविता हिने अजयला दुसऱया मुलीबरोबर लग्न करण्यास विरोध केला होता. यातून त्या दोघांचा सतत वाद होत होता. रविवारी दुपारी अजय आणि सवितामध्ये पुन्हा लग्नाच्या विषयावरून वादावादी झाल्याने चिडलेल्या अजयने चाकूने सवितावर वार केले. यामध्ये ती गंभीर जखमी झाली. तिला रुग्णालयात दाखल केले असता, तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर अजय स्वतःहून शिर्डी पोलिसांत दाखल झाला. त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ अधिक तपास करत आहेत.