पाथरीतील साई जन्मस्थळास सर्वपक्षीय आमदारांची भेट

3711

पाथरीतील साई जन्मस्थळाविषयी वाद निर्माण झाल्यानंतर रविवारी परभणीतील सर्वपक्षीय आमदारांनी पाथरी येथे जाऊन साईजन्मस्थळाचे दर्शन घेतले. साई मंदिर कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांशी व इतर विश्वस्थांशी सकारात्मक चर्चा केली.

आमच्याकडे भक्कम पुरावे आहेत, शिर्डीकरांनी वस्तुस्थिती स्वीकारावी! – खासदार जाधव यांचे आवाहन

उद्या 20 जानेवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिर्डी व पाथरी येथील शिष्टमंडळाची संयुक्त बैठक होणार असून मार्ग न निघाल्यास या बैठकीनंतर शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा निर्णय कृती समिती सदस्यांनी यावेळी जाहीर केला. विशेष म्हणजे साईजन्मस्थळाचा वाद निर्माण झाल्यानंतर पाथरी येथील साईजन्मस्थळास बाहेरगावहून येऊन भेटी देणाऱ्या व जन्मस्थळी भजन कीर्तन करणाऱ्या भाविकांत लक्षणीय वाढ झाली आहे.

parbhani

परभणी जिल्ह्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी पाथरी साई जन्मस्थळासाठी एकवटले असून आज रविवारी परभणीचे शिवसेना आमदार डॉ. राहुल पाटील, डॉ. विवेक नावंदर, पाथरीचे काँग्रेसचे आमदार सुरेश वरपुडकर, जिंतूरचे माजी आमदार विजय भांबळे आदींनी साई मंदिर कृती समितीचे अध्यक्ष बाबाजानी दुर्राणी, विश्वस्थ सीताराम धानू तसेच इतर विश्वस्थ यांची भेट घेऊन पाथरी जन्मस्थळ विश्वस्थ संस्थेच्या पाठीशी असल्याची भावना बोलून दाखवली. पाथरी येथील साई जन्मस्थळाचा वाद न शमल्यास मंगळवार, 21 रोजी साईजन्मस्थळ मंदिरातील दुपारी आरती करून यानंतर लगेच साईबाबांवर सबुरीच्या मार्गाने संबंध पाथरीकरांची पुढील आंदोलनाची दिशा ठरणार असल्याचे मंदिर कृती समितीचे अध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या