आमच्याकडे भक्कम पुरावे आहेत, शिर्डीकरांनी वस्तुस्थिती स्वीकारावी! – खासदार जाधव यांचे आवाहन

11068

साईबाबा हे जगाचे राष्ट्रसंत आहेत. त्यांचे जन्मस्थळ पाथरीचे असल्याचे भक्कम पुरावे असतानादेखील पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय नेते सातत्याने राजकारण करत आहेत. विनाकारण जन्मस्थळाचा वाद निर्माण करून पाथरीच्या विकासात खोडा घालण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय जाधव यांनी केला. संत साईबाबा यांची कर्मभूमी शिर्डी असली तरी जन्मभूमी ही पाथरीच आहे, हे जगाला मान्यच करावे लागेल असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत बैठकीसाठी निमंत्रण दिले असून आहे. या बैठकीमध्ये जन्मस्थळासंदर्भात 29 पुराव्यांनीशी भेटणार असल्याचेही खासदार जाधव यांनी सांगितले

साईभक्तांनी रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भजन करून ‘साई जागर’ आंदोलन केले. या आंदोलनास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी खासदार संजय जाधव यांच्या समवेत एन. व्ही. आनंतवार, बालासाहेब घिके, सुरेश चव्हाण, प्रल्हाद कानडे, राजकुमार भांबरे, रवी रेडडी संतोष शिंदे आंदीसह श्रीसंत साई भक्त सेवा मंडाळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

खासदार संजय जाधव यांनी शिर्डीकरांना सवाल केला की, कुठल्याही संताला धर्म, जात, पंथ नसतो. मग उगीच भांडवल का करता? 1974 ला सातव्या साई आवृत्तीमध्ये जन्मस्थळाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. नेमके शासनाने साईजन्मस्थळाच्या विकासास निधी उपलब्ध करुन दिल्यानंतरच जन्मस्थळाचा प्रश्न उपस्थित का केला जातो? आता जन्मस्थळावरून शिर्डीकरांना यातना का होतात?

खासदार जाधव म्हणाले, पाथरीचा विकास झाल्यास आपले महत्त्व कमी होईल अशी भीती शिर्डीकरांना वाटत असून या भीतीपोटीच ते पाथरी येथील जन्मस्थळास विरोध दर्शवीत आहेत. आमच्याकडे जन्मस्थळासंदर्भात भरपूर पुरावे आहेत. तुमच्याकडे जन्मस्थळाबाबत पुरावे असतील तर ते तुम्ही द्या. आमच्याकडेही भरपूर पुरावे आहेत. ज्यांचा पुरावा खरा आहे तो मान्य करण्यात यावा.

आपली प्रतिक्रिया द्या