साई दरबारी अभिनेत्री राणी मुखर्जी झाल्या भावूक

1928

अभिनेत्री राणी मुखर्जीने सोमवारी दुपारी साई दरबारी हजेरी लावत साई समाधीचे दर्शन घेतले आहे. साई समाधीच दर्शन घेताना राणी मुखर्जी भावुक झाल्या होत्या. नाशिक येथे एका कार्यक्रमासाठी राणी मुखर्जी हिने उपस्थिती दर्शवल्यानंतर तिने साई समाधी दर्शनाचाही लाभ घेतला. साईबाबांनी दर्शनासाठी बोलावलय त्यामुळे येण शक्य झाल्याचं त्या यावेळी म्हणाल्या. बाबांचा आशीर्वाद मला नेहमीच मिळतो. बाबांच्या आशिर्वादाने माझा विवाह झाला, त्यानंतर एक मुलगीही झाली. त्यामुळे बाबांना धन्यवाद देण्यासाठी मी आले असल्याचे त्यांनी सांगीतले.

माझ्या डोळ्यात दर्शनावेळी जे आश्रू आले ते मला आणि बाबांनाच माहीतीय असं सांगत राणीने त्याबद्दल अधिक भाष्य करण्याच टाळल. राणी मुखर्जीची शिर्डीत दहा गुंठे जागाही आहे. तिथे घर बांधण्याची तिची अनेक दिवसांपासुनची इच्छा होती. आपल्या या जगावर घर कधी बांधणार असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला असता त्या म्हणाल्या की,तुम्हीच त्याकरीता बाबांकडे प्रार्थना करा.

दरम्यान, राणीला पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. अनेकांनी तिच्यासोबत फोटो , सेल्फीही काढले. साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी साईबाबांची मुर्ती आणि नव वर्षाच कैलेंडर देऊन मर्दानी राणीचा सत्कार केला.

आपली प्रतिक्रिया द्या