
पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण देश हादरून गेलेला असतानाच आता लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीतील साईबाबा मंदिराला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. शिर्डी संस्थानला अज्ञात व्यक्तीने हा धमकीचा ई-मेल केला आहे. शुक्रवारी सकाळी हा मेल आल्याची माहिती समोर येत असून या धमकीमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. माध्यमांनी याबाबत वृत्त दिले आहे.
वृत्तानुसार, शनिवारी सकाळी अज्ञात व्यक्तीने ई-मेलद्वारे ही धमकी दिली. हा ई-मेल नेमका कुणी पाठवला आणि कुठून पाठवला याचा शोध सुरू आहे. याबाबत शिर्डी संस्थान आणि शिर्डी पोलिसांनीही अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे. मात्र शिर्डी मंदिर परिसरामध्ये सुरक्षा यंत्रणा अलर्टमध्ये असल्याचे कळते.