श्री पुण्‍यतिथी उत्‍सवात 3 कोटी 95 लाख 12 हजार 844 रुपये देणगी

682

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था शिर्डीच्‍या वतीने आयोजित 101 व्या श्री पुण्‍यतिथी उत्‍सवात सुमारे 2 लाख 25 हजार साईभक्‍तांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतल्‍याची माहिती संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली. मुगळीकर म्‍हणाले, श्री पुण्‍यतिथी उत्‍सवात सशुल्‍क व ऑनलाईन पासव्‍दारे एकुण 57,43,800 रुपये देणगी प्राप्‍त झाली आहे.

दानपेटीतून 1,73,85,416 रुपये, देणगी काउंटरव्‍दारे 91,03,474, डेबीट क्रेडीट कार्ड, ऑनलाईन देणगी, चेक/डिडी, मनी ऑडर आदींव्‍दारे 1,08,76,450 रुपये देणगी रक्‍कम स्‍वरुपात प्राप्‍त झाली आहे. तसेच सोने 375.930 ग्रॅम (12 लाख 67 हजार रुपये) व चांदी 3110.350 ग्रॅम (83 हजार रुपये) तर 19 देशांमधुन परदेशी चलनाव्‍दारे 4,70,903 रुपये देणगी प्राप्‍त झालेली आहे. तसेच भिक्षा झोळीत गहू, तांदुळ, बाजरी, ज्‍वारी, गुळ व खाद्य तेल आदींव्‍दारे 2,61,529 रुपये व 65,072 रुपये रोख रक्‍कम अशी एकुण 3,26,601 रुपये इतकी देणगी प्राप्‍त झाली आहे. एकूण 3 कोटी 95 लाख 12 हजार 844 रुपये देणगी प्राप्‍त झाल्‍याचे मुगळीकर यांनी सांगितले.

तसेच श्री साईप्रसादालयात उत्‍सव काळात 2,05,735 साईभक्‍तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला व 43 हजार 422 साईभक्‍तांनी अन्‍नपाकीटांचा लाभ घेतला. याबरोबरच 1,02,168 लाडु पाकीटांची विक्री करण्‍यात आली असून याव्‍दारे 25,54,200 रुपये प्राप्‍त झाले आहे. तर 2,17,200 मोफत बुंदी प्रसाद पाकीटांचे दर्शनरांगेतून साईभक्‍तांना वाटप करण्‍यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या