शिरोळ : पुरानंतर घाण आणि दुर्गंधीचे सामाज्र, रोगराई वाढण्याची शक्यता

503

शिरोळ तालुक्यात मुसळधार पाऊस व त्यामुळे आलेल्या महापुरात तालुक्यातील अनेक गावांनी आपलं सर्वस्व गमावून बसले आहे. अनेकांची घर-संसार या महापुरात वाहून गेले, अनेकांची गुर, गाड्या इत्यादी सगळं या महापुराने गिळंकृत केलं आहे. तालुक्यातील श्री क्षेत्र नरसोबाचीवाडी, खिद्रापूर, बस्तवड राजापूरवाडी, कुरुंदवाड, राजापूर, हेरवाड यासह 22 गावे पाण्याखाली गेले होते. हजारो घरे पडली आहेत तर मुके जनावरे वाहून गेली. पूर ओसरू लागला असला तरी पाणी संत गतीने कमी होत आहे. ज्या भागात पूर ओसरत आहे त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात दलदल झाली असून घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्या ठिकाणी दुर्गंधी प्रचंड प्रमाणात असल्याने नागरिकांना रोगराईला सामोरे जावे लागत आहे.

गेल्या 10 दिवसापासून तालुक्यातील अनेक गावे अंधारत आहेत. तालुक्यातील कृष्णा-पंचगंगा या दोन नद्या पत्रात जाण्यासाठी किमान चार दिवस लागतील पाऊस कमी झाल्यामुळे पूरग्रस्त आपल्या गावी जाऊन पडलेल्या2 घरातील प्रापंचिक साहित्य पाहत आहेत मात्र अनेकांचे संसार या महापूरात वाहून गेल्याने अनेकांच्या डोळ्यातून अश्रूचां महापूर ओसंडून वाहत आहे.

महापुरात हाजारो हेक्टर पीकक्षेत्र पाण्याखाली गेले. तर मातीचे घरे जमिनदोस्त झाली. रस्त्यांवर दहा ते पंधरा फूट पाणी आल्याने मदतकार्यात अडथळे आले. कृष्णा, पंचगंगा, वारणा, दूधगंगा या नद्यांच्या महापुराने शिरोळ तालुक्यास मोठा तडाखा दिल्याने सर्वत्र हाहाकार माजला होता. पावसाचे थैमान तसेच धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने बघता – बघता पुराचे पाणी पात्राबाहेर पडले. कृष्णा व पंचगंगा नदीने रौद्ररूप धारण केले. पुराच्या पाण्याने वेढा दिल्याने अनेक गावांना बेटाचे स्वरूप आले. महापुराने हजारो कुटुंबांचे संसार आणि शेतजमिनीतील पिकांना आपल्या कवेत घेतले. शेकडो घरे जमिनदोस्त झाली. शेतीचेही कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले. अक्राळ-विक्राळ रुप धारण केलेल्या या महापुराने लोकांचे जगणे मरणप्राय केले. घरे पाण्याखाली गेल्याने प्रापंचिक साहित्याबरोबरच पशुधन वाहून गेले. अशा स्थितीत ग्रामस्थांना यांत्रिक बोटीतून आपला गाव सोडावा लागला.

आपली प्रतिक्रिया द्या