उमळवाडच्या सरपंचपदी शिवसेनेचे गोरखनाथ चव्हाण विराजमान

726

शिरोळ तालुक्यातील उमळवाड येथील सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे उमळवाड शाखाप्रमुख गोरखनाथ भूपाल चव्हाण यांनी बाजी मारली. आपले निकटचे प्रतिस्पर्धी सुहास तिवडे यांचा त्यांनी 204 मतांनी पराभव केला. या निवडणुकीसाठी एकूण सात उमेदवार रिंगणात होते.

शिरोळ तहसीलदार कार्यालयात मतमोजणी झाली. गोरखनाथ चव्हाण यांना विजयी घोषित करताच शिवसैनिक व अन्य कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. त्यांची शिरोळपासून उमळवाडपर्यंत गुलालाची उधळण करीत मिरवणूक काढण्यात आली.

उमेदवारनिहाय पडलेली मते अशी –
गोरखनाथ चव्हाण (1272 विजयी), सुहास तिवडे (1068), अमोल कांबळे (108), तुकाराम कांबळे (40), प्रभावती कांबळे (91), बापू कांबळे (291), भिकू कांबळे (154), नोटा (28).

आपली प्रतिक्रिया द्या