
सामना प्रतिनिधी। कवठे येमाई
शिरूर तालुक्यातील शिक्रापूर -तळेगाव ढमढेरे रस्त्यावर कचऱ्याचे व दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्यच धोक्यात आले आहे.
या परिसरातील आजुबाजुचे रहिवासी, हाँटेल व्यवसायिक, छोटे मोठे दुकानदार रस्त्यालगच कचरा टाकत आहेत. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साठले आहेत.
यामुळे येथे डासांचा प्रार्दुभाव वाढला आहे. कचऱ्याची गाडी वेळेवर येत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. यामुळे कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी पर्यावरणप्रेमी करत आहे. एकीकडे राज्यात सर्वत्र प्लास्टीक बंदी असुनही कचर्याच्या ढिगात मोठ्या प्रमाणात प्लास्टीकच्या छोट्या मोठ्या पिशव्या टाकलेल्या दिसून येत आहेत. प्लास्टीक बंदीचा आदेश केवळ कागदावर न रहाता संबधित प्रशासनाने याची तीव्र स्वरूपात अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.
































































