शिरूर – जांबूतला 6 शेतमजुरांच्या झोपड्या जळून खाक

211

शिरूरच्या बेट भागातील जांबुत येथे शेतमजुरी करणाऱ्या 6 मजुरांच्या झोपड्या मंगळवारी अचानक लागलेल्या आगीत भस्मसात झाल्या. सुदैवाने यात जीवित हानी जरी झालेली नसली तरी या आगीत 6 शेतमजुरांचे सुमारे सहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, येथील थोरात वस्तीनजीक प्रकाश चव्हाण यांच्या शेतात झोपड्या करून वास्तव्यास असणाऱ्या गणेश दुधडे, संतोष पारधी, अभिमन्यू अतोळे, सूनील दुढदे, बबन खोमणे, अभिजित कोकणे शेतमजुरांच्या 6 झोपड्या मंगळवारी सायंकाळी 4 च्या सुमारास झालेल्या आगीच्या दुर्दैवी घटनेत जळून खाक झाल्या. या घटनेत या सर्व शेतमजुरांचे संसार उपयोगी पूर्ण साहित्य, ६ गॅस टाक्या, गॅस शेगडी, टीव्ही, कपडे, पैसे, मोटारसायकल, 6 सायकली पूर्णपणे जळून खाक झाले आहेत. गॅस लिकेज मुळे हे जळीत झाले असण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून आगीच्या या दुर्दैवी घटनेत 6 लाख रुपयांचे नुकसान झाले असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या