रत्नागिरीत सोशल डिस्टन्सिंग पाळत शिवभोजन थाळी आपल्या दारी

581

लॉकडाऊनच्या काळात रत्नागिरीतील गरजूंना जेवण मिळण्यासाठी शिवभोजन थाळी थेट गरजूंच्या घराजवळ जाऊन देण्यात येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदीच्या काळात सोशल डिस्टन्स राखण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे.

कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन मध्ये आहे अशा वेळी सर्वाना बाहेर पडणे बंद झालं आहे ह्या प्रसंगी सर्व सामान्य गरीब जनतेला पोटभर अन्न मिळावे यासाठी महाराष्ट्र सरकारने शिवभोजन दहा रुपयावरून फक्त पाच रुपयात केले आहे . पाच रुपयात शिवभोजन देण्यात यावे असे आदेश महाराष्ट्र सरकारने काढले आहेत.

ज्या ठिकाणी एक वेळचे पण पूर्ण जेवण मिळत नाही अशा वस्तीमध्ये जाऊन  सोशल डिस्टनसिंगचा नियम पाळून थेट शिवभोजन त्यांच्या दारी अशी संकल्पना शिवभोजन चे ठेकेदार हॉटेल मंगला यांनी आता राबवत आहे. घरपोच शिवभोजन थाळी गणेश  धुरी ९८६००९४८४८ यांच्याशी संपर्क साधावा.

आपली प्रतिक्रिया द्या