शिवप्रतिष्ठान कडुन गरीबांना मोफत भोजन व्यवस्था

संपूर्ण जग सध्या कोरोना विषाणूच्या संकटाला सामोरे जात आहे. संपूर्ण देशात पंतप्रधान यांनी 21 दिवस लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यामुळे जामखेड तालुक्यातील हातावर पोट भरणाऱ्या लोकांचा प्रश्न निर्माण झाला आसतानाच जामखेड येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने गरीबांना भोजन वापट करण्यास सुरुवात केली आहे.

या परिस्थितीत अत्यावश्यक सेवांसाठी घराबाहेर पडलेले नागरिक हातावर पोट असलेले समाज बांधव आणि मुख्यत्वे आपले स्वच्छता सैनिक यांचे खाण्याचे हाल होऊ नयेत म्हणून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जामखेडचे सर्व धारकरी पुढील काही दिवस दररोज गरजू व्यक्तींसाठी मोफत फूड पॅकेट्स, जेवणाचे डबे देणार आहेत, अशी माहिती श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जामखेड तालुकाध्यक्ष पांडुराजे भोसले यांनी दिली.

सध्या कोरोना व्हायरस पसरला आहे अशामध्ये गोरगरीब जनतेला बाहेरगावहून आलेल्या विद्यार्थ्यांना स्वच्छता कर्मचाऱ्यांना आणि हातावर पोट असणाऱ्या गरजवंतांना श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान जामखेड च्या वतीने व्हायरसचा प्रादुर्भाव कमी होईपर्यंत अन्नछत्र सुरू करण्यात आलेले आहे हे अन्नछत्र गरजवंतासाठी सुरू करण्यात आलेले आहे. ज्यांना खरोखरच गरज आहे अशांनी त्वरित जामखेड तालुकाध्यक्ष पांडुराजे भोसले यांच्याशी या नं.9209945787 संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या