
सामना ऑनलाईन । हिंगोली
शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे हिंगोली दौऱ्यावर आहेत. बुधवारी हिंगोली लोकसभा मतदारसंघातील माहूर येथे शिवसैनिकांनी आदित्य ठाकरे यांचे आनंदाने आणि जल्लोषात स्वागत केले. यानंतर आदित्य ठाकरे यांनी माहूरगड येथे जाऊन श्री रेणुका देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली.




























































