
शिवसेनेची राज्यात घौडदौड जोरदार सुरू असून कोकणपट्टा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे. मंगळवारी लागलेल्या निकालात शिवसेना-भाजप-रिपाइं-रासप महायुतीला मोठे यश मिळाले आहे. महाडच्या चोचिंदे ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे.
दरम्यान, कर्जत तालुक्यातील 5 ग्रामपंचायतींसाठी शनिवारी मतदान पार पडले. मंगळवारी या निवडणुकीसाठीची मतमोजणी पार पडली. नेरळ ग्रामपंचायतीमध्ये शिवसेना, भाजप, रिपाईं महायुतीने दणदणीत विजय मिळवला असून या ग्रामपंचायतीवर पूर्ण वर्चस्व मिळवलं आहे. इथल्या 17 पैकी 13 जागांवर महायुतीने विजय मिळवला आहे. नेरळ ग्रामपंचायतीचे सरपंचपद शिवसेनेकडे आले असून कर्जत तालुक्यातील उमरोली आणि जामरूख ग्रामपंचायतीवर शिवसेनेकडे आली आहे.
तसेच मागील 20 वर्षापासून शेकापचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेण तालुक्यातील शेडाशी ग्रामपंचायतीवर भगवा फडकवण्यात शिवसेना यशस्वी ठरली आहे.























































