
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी 25 सप्टेंबर म्हणजेच आज नवी मुंबईत एका कार्यक्रमात एकत्र येणार आहेत. माथाडी कामगार चळवळीचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांच्या 86 व्या जयंतीनिमित्त वाशीत आयोजित करण्यात आलेल्या माथाडी मेळाव्यास ते मार्गदर्शन करणार आहेत. युतीचे काय होणार यावर चर्चा सुरू असतानाच युतीचे दोन प्रमुख नेते या व्यासपीठावरून काय बोलणार याकडे महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागले आहे. तसेच शरद पवार यांच्याबद्दल काय बोलणार, याकडेही साऱ्यांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे देशभरातील वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी या मेळाव्यास हजर राहिले आहेत.
वाचा या कार्यक्रमाचे Live Update –
- माथाडी कामगार हे फक्त कामगार न राहता मालक बनले पाहिजे
- सर्व पक्षातील नेते इथे एकत्र आले आहेत
- सूडाने वागण्याची महाराष्ट्राची संस्कृती नाही, आम्ही तसे करणार नाही
- नरेंद्र पाटील हे खासदार म्हणून पाठवायचं स्वप्न आहेच
- माथाडी कामगारांनी नुसती ओझी वाहू नये
- आम्हाला माहीत आहे की चळवळ टिकवणं सोपं नाही, आज ती 50 वर्ष पूर्ण करत आहे
- आम्हाला विश्वास आहे की महायुतीचे सरकार येणार म्हणजे येणारच
- अण्णासाहेब आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी संघर्षासाठी प्रेरणा दिली
- हा एक भावनिक सोहळा आहे
- मी एक फोटोग्राफर म्हणून माझ्या लक्षात आलं की माझ्या एका बाजूला नरेंद्र आणि दुसऱ्या बाजूला देवेंद्र आहे
- उशीर झाला म्हणून सगळ्यांची माफी मागतो
- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला सुरुवात
- आम्ही या चळवळीच्या पाठीशी उभं राहू
- आमचं सरकार काल, आजही माथाडी कामगारांच्या पाठीशी उभे आहे आणि यापुढेही आमचं सरकार येणार आहे तेव्हाही आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. हे माझ्यावतीने आणि उद्धवजींच्या वतीने महायुतीच्या सरकारच्या वतीने आपल्याला सांगतो आहे
- ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नाही तर कामगाराच्या तळहातावर आहे असं अण्णासाहेब म्हणायचे
- या कायद्याने अंगमेहनत करणाऱ्यांना संरक्षण दिलं
- माथाडी कायद्याला 50 वर्ष झाल्याबद्दल अभिनंदन करतो
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणास सुरुवात
- माथाडी कामगारांच्या मेळाव्याला प्रचंड गर्दी
- महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे देखील उपस्थित
- आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे देखील या कार्यक्रम स्थळी उपस्थित
- शिवसेना पक्ष्रप्रमुख उद्धव ठाकरे मंचावर उपस्थित झाले
- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रम स्थळी पोहोचले

























































