
उदय जोशी । बीड
युतीच्या काळात भाजपाकडे असलेल्या बीड जिल्ह्यात आज शिवसेनेची गर्जना होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मंगळवारी बुथप्रमुख आणि गटप्रमुखांना मार्गदर्शन करण्यासाठी बीड मध्ये येत आहेत. त्यांच्या बीड दौऱ्याने शिवसैनिकात उत्साहाचे वातावरण संचारले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील गट प्रमुख, बूथ प्रमुखांचा मेळावा होत आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा लक्षवेधक ठरणार आहे. उद्धव ठाकरे बीड मध्ये काय बोलतात, बुथप्रमुखांना काय मार्गदर्शन करणार हे महत्वाचे ठरणार आहे. त्यांच्या सोबत शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख सुधीर मोरे, महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख संपदाताई गडकरी उपस्थित राहणार आहेत.






















































