शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचा कक्ष पदाधिकारी मेळावा उत्साहात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना सचिव, खासदार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष अनिल देसाई यांच्या सूचनेनुसार आणि सरचिटणीस विजय मालणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्रातील नवनियुक्त कक्ष पदाधिकाऱयांचा मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अंधेरीतील पंट्री क्लबमध्ये घेण्यात आलेल्या मेळाव्याला अंधेरी पश्चिम, वर्सोवा, अंधेरी पूर्व, जोगेश्वरी, गोरेगाव, दिंडोशीमधील कक्ष पदाधिकारी उपस्थित होते.

ग्राहक संरक्षण कायदा 2019 च्या अनुषंगाने ग्राहकांच्या तक्रारी कशा सोडवाव्या, ग्राहक न्यायालयाची माहिती, कक्षाचा प्रसार आणि प्रचार, मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक याबाबत कक्षाचे सचिव अशोक शेंडे, सहसचिव वनिता पटेल यांनी मार्गदर्शन केले. सरचिटणीस विजय मालणकर यांनी कक्ष शिस्त, कक्षातील पदाधिकाऩयांची जबाबदारी, कक्ष वाढीबाबत मार्गदर्शन केले.

मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन उत्तर पश्चिम लोकसभा कक्ष समन्वयक संजय पावले यांच्या पुढाकाराने तसेच कक्ष विधानसभा संघटक विक्रम शाह, अॅड. हर्षल साळवी, रवींद्र चिले, प्रकाश भोसले यांच्या सहकार्याने करण्यात आले. मेळाव्याचे सूत्रसंचालन स्मिता चेटीयार यांनी केले. यावेळी लोकसभा क्षेत्रातील सर्वच कक्ष पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.