
सामना ऑनलाईन । कुडाळ
कुडाळ नगरपंचायतीचे लक्ष्मीवाडी प्रभागाचे शिवसेनेचे नगरसेवक व युवा उद्योजक देवानंद काळप यांनी लक्ष्मीवाडी प्रभागात स्वखर्चाने पायवाट बांधून दिली. याबाबत ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे. आंगचेकर घर ते काळपवाडी येथील विहिरिपर्यंत जाणारी पायवाट व्हावी अशी अनेक वर्षांची ग्रामस्थांची मागणी होती. नगरसेवक काळप यांनी ही मागणी स्वखर्चाने पुर्ण करुन दिली आहे. तसेच स्वतः लक्ष घालून काम पूर्ण करुन घेतले आहे. सुमारे 40 हजार रूपये खर्च त्यांनी या कामासाठी केला.
































































