
सामना प्रतिनिधी । खर्डी
ठेकेदाराच्या मनमानीमुळे मुंबई-आग्रा महामार्गालगत असणाऱ्या खर्डी नाका येथील एसटीचे उपाहारगृह व बसथांबा दोन वर्षांपासून गर्दुल्ले आणि दारुडय़ांचा अड्डा बनले आहे. त्यामुळे येथे एसटी महामंडळाने लवकरात लवकर फूड मॉल उभारून स्थानिक बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा व एसटी थांबाही पूर्ववत करावा, अशी मागणी येथील प्रवाशांनी केली आहे.
मुंबई-आग्रा महामार्गावरील खर्डी नाक्याकर एसटी महामंडळाची एक हेक्टर ४८ गुंठे जागा असून त्या जागेत तीन वर्षांपूरर्वी बाहेरवाहून येणाऱ्या-जाणाऱ्या गाडय़ा येथे थांबत होत्या. त्यातून एसटी महामंडळाला उत्पन्न सुरू होईल, या उद्देशाने येथे उपाहारगृहही सुरू करण्यात आले. मात्र बाहेरून येणाऱ्या बस गाडय़ांच्या चालक-वाहकांच्या मनमानीमुळे येथे दोन वर्षांपासून गाडय़ाच थांबत नसल्याने येथे भंगारवाल्यांनी गोडाऊन केले आहे. त्यामुळे या समस्यांवर तत्काळ उपाययोजना करून बाहेर गावावरून येणाऱ्या-जाणाऱ्या बसेसचा येथे थांबा सुरू करावा, अशी मागणी शहापूरचे शिवसेना उपतालुकाप्रमुख भाई देहेरकर यांनी केली.
प्रकाशांच्या खिशाला कात्री
खर्डीपासून तीन किमी अंतराकरील खासगी धाब्याकर गाडय़ा थांबतात. रात्री येथून प्रकाशांना पायी चालत जावे लागते. नाशिककहून बसमध्ये बसलेल्या प्रकाशाला खर्डीचे तिकीट न देता शहापूरचे तिकीट देत असल्याने भुर्दंड सहन करावा लागत असल्याचे प्रकासी बुधा भोईर यांनी सांगितले.































































