पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घ्या, अतिक्रमण हटवा! शिवसेनेची मागणी

1593

हिंगोली शहरात शिवसेनेच्या वतीने आयोजीत कावडयात्रेवर समाजकंटकांनी केलेल्या दगडफेकीनंतर काही पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिस्थिती योग्यरित्या हाताळली असून तीन कर्मचाऱ्यांवरील निलंबनाची कारवाई तात्काळ मागे घ्यावी, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांच्यासह शिवसेनेच्या शिष्टमंडळाने विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल व पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाव्दारे केली आहे. तसेच शिवसेनेच्या वतीने नगर पालिकेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांना निवेदन देऊन शहराच्या विविध भागातील अतिक्रमणे दोन दिवसात हटवावीत, अशी मागणी करण्यात आली.

12 ऑगस्ट रोजी हिंगोली शहरात धर्मांध मुस्लीमांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी आयोजीत केलेल्या कावडयात्रेवर तसेच शिवसैनिक व शिवभक्तांवर दगडफेक करुन हैदोस घालत वाहनांची तोडफोड केली. दरम्यान, समाजकंटकांकडुन शहर पेटविण्याचा डाव हाणुन पाडल्याबद्दल जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी पोलीसांचे आभार व्यक्त केले. पोलीस कर्मचारी गणेश वाबळे, विलास शिनगारे, नितीन रामदिनवार या तिघांवर निलंबनाची कारवाई झाली असून ही कारवाई मागे घ्यावी, अशी मागणी शिवसेनेने निवेदन देऊन केली आहे. तसेच हिंगोली शहरातील गांधी चौक जवाहर रोड, अग्रसेन चौक ते अंबिका टॉकीज या रस्त्यावर अवैधरित्या हातगाडे चालक व फुटकळ व्यापारी दुकानदारी करत आहेत. यामुळे रहदारीला व वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. यामुळे ही अतिक्रमणे दोन दिवसात हटविण्यात यावीत, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. शिवसेनेच्या या शिष्टमंडळात जिल्हाप्रमुख संतोष बांगर, उपजिल्हाप्रमुख परमेश्वर मांडगे, कृऊबाचे माजी सभापती रामेश्वर शिंदे, जिल्हा संघटक उध्दवराव गायकवाड, नगरसेवक सुभाष बांगर, राम कदम, संदीप मुदिराज, दिनेश चौधरी, युवासेना जिल्हा युवा अधिकारी दिलीप घुगे, किशोर मास्ट, कानबाराव गरड, गुड्डु बांगर, प्रकाश घुगे, आनंदराव जगताप आदी सहभागी झाले होते

आपली प्रतिक्रिया द्या