
शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांची सक्त वसुलीसंचनालयाने (ईडी) आज तीन तास चौकशी केली. चौकशीसाठी अडसूळ आज ईडीच्या कार्यालयात आले होते. सिटी बँक घोटाळा प्रकरणी ईडीने गुन्हा दाखल केला होता. त्याबाबत ईडी चौकशी करत आहेत.
समन्स नव्हते, माहिती देण्यासाठी गेलो होतो – अडसूळ
ईडीने चौकशीबाबत आपल्याला कोणतेही समन्स पाठवले नव्हते असे शिवसेना नेते, माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी स्पष्ट केले आहे. मात्र आमदार रवी राणा आणि भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या वारंवार बेताल आरोप करत आहेत. त्याबाबत अमंलबजावणी संचलनालयाला काही माहिती हवी होती. ती देण्यासाठी आपण ईडीच्या कार्यालयात गेलो होतो, असे त्यांनी संगितले.



























































