Live – ‘आम्ही 162’ हे शक्तीप्रदर्शन नाही, तर सत्याचा प्रयोग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sanjay-raut-saheb-new

सोमवारी शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्यासह सहयोगी अपक्षांनी ‘आम्ही 162’ असं हे मीडियासमोर सिद्ध केलं आहे. त्यानंतर शिवसेना नेते, खासदार संजय राऊत आज काय बोलणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

  • अजित पवार हे जागतिक स्तरावरचे नेते आहेत, आमच्या मांडीला मांडी लावून बसले होते, सरकार कोणी कसे चालवायचे हे सांगत होते, त्यांनी जे क्रांतीकार्य केले आहे त्यावर मी काय बोलू

  • प्रश्न करणाऱ्यांना करू द्या, बहुमत आहे तर विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जा
  • पण सत्य काय ते आम्ही लोकांसमोर आणलं
  • त्यांच्या पक्षाने लपून छपून सारे शपथविधी केला आणि मग ते सारे पळून गेले
  • आज नरेंद्र मोदी हे संविधान दिनानिमित्त बोलणार आहेत, पण महाराष्ट्रात त्याच संविधानाचं पालन केलं जात नाही
  • जे आम्ही आहोत ते आम्ही दाखवून दिले
  • सोमवारी आम्ही 162 आहोत ते शक्तीप्रदर्शन नाही, तर सत्याचा प्रयोग
  • उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी अत्यंत संयमाने या सर्व गोष्टी घेतल्या आहेत
  • शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे, तर राष्ट्रवादीचे जयंत पाटील आहेत
  • कोण काय बोलतं त्यावर मी बोलणं योग्य नाही
  • सोमवारी आम्ही जे पत्र राजभवनावर दिले आहे, त्याच प्रमाणे 162 काल होते
  • संसदेतही चर्चा होत आहे
  • आज संविधान दिन आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बहुमताची हत्या करून सत्तेत या असे नाही सांगितले
  • बहुमत आमच्याकडे आहे हे आम्ही सोमवारी दाखवले आहे