कलंकित-असंवेदनशील मंत्र्यांना निलंबित करा;शिवसेनेच्या शिष्टमंडळाची राज्यपालांकडे मागणी

महायुती सरकारमधील कलंकित, भ्रष्टाचारी व असंवेदनशील मंत्री व आमदारांना तत्काळ निलंबित करण्यात यावे, या मागणीसाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. ‘

राज्यात कायदा व सुव्यवस्थेचे पूर्णपणे धिंडवडे निघाले असून सर्वसामान्यांमध्ये भीतीचे व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. भ्रष्टाचारी, कलंकित व हिंसक आमदारांना बडतर्फ करून कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांना द्यावेत या मागणीसाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन निवेदन दिले.

या शिष्टमंडळात शिवसेना नेते अनिल परब, उपनेते विनोद घोसाळकर, बबनराव थोरात, अशोक धात्रक, विजय कदम, नितीन नांदगावकर, आमदार अनंत नर व महेश सावंत, मनोज जामसुतकर, आमदार मिलिंद नार्वेकर, विठ्ठल गायकवाड, भाऊ कोरगावकर, सुषमा अंधारे, सुप्रदा फातर्फेकर, शिवसेना उपनेत्या विशाखा राऊत, सचिव साईनाथ दुर्गे, पराग डाके, ज. मो. अभ्यंकर, नितीन देशमुख आदींचा समावेश होता.

– मंत्र्यांचे गैरव्यवहार, वादग्रस्त वक्तव्ये आणि विविध प्रकरणांबद्दल राज्यपालांना माहिती देण्यात आली. मंत्री संजय शिरसाट, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, संजय राठोड,

राज्यमंत्री योगेश कदम तसेच मंत्री नितेश राणे, आमदार संजय गायकवाड यांच्या गंभीर प्रकरणांची माहिती राज्यपालांना दिली.