
हिंगोली शहरात आज शिवसेनेच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हजारो शिवसैनिकांची उपस्थिती होती. शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव शिवसेनेच्या महामेळाव्याला व्यासपीठावरुन संबोधित केले.

हिंगोली येथील छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळा परिसरापासून हजारो शिवसैनिकांनी शिवसेना नेते भास्कर जाधव, संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांच्यासोबत सभा स्थळापर्यंत पायी रॅली काढण्यात आली होती.

शिवसेनेच्या महामेळाव्याप्रसंगी शिवसेना नेते भास्कर जाधव, संपर्कप्रमुख बबनराव थोरात, उपनेत्या ज्योती ठाकरे यांचा जंगी सत्कार सत्कार करण्यात आला. यावेळी माजी खासदार सुभाष वानखेडे, माजी मंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा, शिवसेना जिल्हाप्रमुख विनायक भिसे, संदेश देशमुख, संपकप्रमुख गोपू पाटील, जिल्हा संघटक बालासाहेब मगर, सुनील काळे, गणेश शिंदे, दिलीप घुगे आदी.

महात्मा गांधी चौक परिसरात शिवसेनेच्या महामेळाव्याला संबोधित करतांना शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्यासमोर हजारो शिवसैनिकांची उपस्थिती दिसून येत आहे.





























































