शिवसेना आमदार राहुल पाटील यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, शहरातून अभूतपूर्व रॅली

2048

शिवसेना-भाजप-रिपाई महायुतीचे परभणी विधानसभा मतदार संघाचे उमेदवार तथा आमदार डॉ. राहुल पाटील यांची गुरुवारी परभणी शहरात अभूतपूर्व रॅली निघाली. शनिवार बाजार मैदानावरुन निघालेली ही भव्य रॅली शहरातील मुख्य मार्गावरून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर आली आणि तेथे समारोप करण्यात आला. रॅलीमध्ये प्रचंड गर्दी झाल्यामुळे सर्वत्र भगवेमय वातावरण झाले होते. या रॅलीचे शहरात जागो जागी स्वागत करण्यात आले. शिवसेना, भाजप, रिपाई यांच्यासह शिवप्रेमी जनता मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. या शक्तीप्रदर्शनामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरल्याचे चित्र दिसून आले.

सकाळी 11 वाजता या रॅलीस शनिवार बाजारच्या मैदानावरुन प्रांरभ झाला. भगवे फेटे, रुमाल, शेले, पागोटे, झेंडे हाती घेतलले शिवसैनिक सर्वांचे लक्ष वेधून घेत हाते. शिवाजी चौक, गुजरी बाजार, गांधी पार्क येथे 251 महिलांनी महायुतीचे उमेदवार डॉ. राहुल पाटील यांचे औक्षण केले. या शिवाय व्यापाऱ्यांनी ठिकठिकाणी स्वागत करून शुभेच्छा दिल्या. शहरातील मुख्य मार्गावरून मुंगीलाही जागा मिळणार नाही, अशीही अभूतपूर्व रॅली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आली. तेथून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर या रॅलीचा समारोप झाला. तेथे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव यांनी रॅलीला संबोधीत केले. शिवसेनेच्या या झंजावातापुढे विरोधक नामोहरम झाला असून महायुतीचे उमेदवार डॉ. राहुल पाटील यांचा विजय निश्चित झाला आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भगवे पतका, झेंडे घेवून पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक, युवासैनिक, शिवप्रेमी जनतेने मोठ्या संख्येने रॅलीत सहभाग नोंदविला होता. या रॅलीच्या मुख्य वाहनावर महायुतीचे उमेदवार डॉ. राहुल पाटील यांच्यासह भाजपाचे प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. विजयराव गव्हाणे, अजय गव्हाणे, मीना परतानी, शिवसेना सहसंपर्कप्रमुख डॉ. विवेक नावंदर, आमदार विप्लव बाजोरिया, रिपाईचे डी.एन. दाभाडे, शिवसंग्रामचे नेते सुभाषदादा जावळे,ज्येष्ठ शिवसैनिक तथा माजी जिल्हाप्रमुख भास्कर लंगोटे, संदीप भंडारी, राजू कापसे पाटील, जि.प. सदस्य गजानन देशमुख, रवी देशमुख, उपजिल्हाप्रमुख संजय गाडगे, तालुकाप्रमुख नंदू पाटील आवचार, शहरप्रमुख ज्ञानेश्वर पवार, गटनेता चंदू शिंदे, नगसेवक प्रशास ठाकूर, सुशील कांबळे, विशू डहाळे, रामजी तळेकर, विठ्ठल तळेकर, बाळराजे तळेकर, दिलीप ताडकळसकर, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक सखुबाई लटपटे, अंबिका डहाळे, कुसूम पिल्लेवाड, दिनेश नवाडकर, मोहन कुलकर्णी, नगरसेविका मंगल मुदगलकर, सुनिता घुगे, माधवी घोडके, प्रभावती अन्नपूर्वे, संजय रिझवाणी आदींची उपस्थिती होती.

आपली प्रतिक्रिया द्या