
गुन्हे प्रक्रिया कायद्यामध्ये बदल होत आहेत. चांगले आहे. देशाच्या गृहमंत्र्यांनी सांगितलं आहे की या कायद्याचा गैरवापर होणार नाही. मात्र, सध्या जे सुरू आहे ते पाहता हेच तुम्ही आमच्या डोळ्यात डोळे घालून सांगू शकाल काय, असा सवाल करत शिवसेनेने आज राज्यसभेत जोरदार हल्लाबोल केला.
गुन्हे प्रक्रिया कायदा दुरुस्ती विधेयकावरील चर्चेत सहभागी होताना शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पेंद्र सरकारच्या कायद्याच्या गैरवापराबद्दल आसूड ओढले.
नव्या कायद्याचा गैरवापर होणार नाही हे गृहमंत्री म्हणत आहेत. मग सध्या काय सुरू आहे.
102 वर्षांपूर्वीचा कायदा बदलला जातोय. मन स्वच्छ असेल तर विरोध करण्याचं कारण नाही. पण गुन्हेगार कोण आहे? जो तुम्हाला प्रश्न विचारणार तो अपराधी बनतो. पोलिसांना राक्षस बनवलं जातंय, असा घणाघातही त्यांनी केला.



























































