
परळच्या टाटा रुग्णालयाजवळील बोगदा चाळ म्हणजेच बामणदेव सहकारी गृहनिर्माण संस्थेचा रखडलेला प्रकल्प अखेर मार्गी लागला. गेली 15 वर्षे हा प्रकल्प रखडला होता. शिवसेनेने येथील रहिवाशांना दिलेले वचन अखेर पूर्ण केले.
आमदार अजय चौधरी यांच्या प्रयत्नाने हा प्रकल्प मार्गी लागला. बोगदा चाळीतून विस्थापित झालेल्या सर्वच रहिवाशांना एकरकमी चालू वर्षाचे भाडे आणि आगाऊ पुढील वर्षाचे भाडे विकासक स्पी. रिअल्टर्सचे मालक रामेश्वर सर्वदमण सांबारी यांच्यातर्फे देण्यात आले. अजय चौधरी यांच्या हस्ते सर्व रहिवाशांना त्यासाठीच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. हा प्रकल्प पुढे नेण्यासाठी वेळोवेळी संस्थेचे सल्लागार भाई जाधव यांचे सहकार्य लाभले. तसेच संस्थेचे पदाधिकारी रामचंद्र दुदम, गोपीनाथ भगत, उल्हास पाटील तसेच सदस्य अशोक काळे, अनंत पाटील, विजय आंब्रे, सुभाष बिले, चंद्रकांत कदम, रमेश गांधी, नेहा पुरव, अलका शेरवाडे यांनी प्रचंड मेहनत घेतली.




























































