मुंबई विभाग क्र.2 मधील शिवसेना पदाधिकारी जाहीर

157

सामना प्रतिनिधी । मुंबई

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मुंबई विभाग क्र. 2 मधील शिवसेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

उपविभागप्रमुखपदी राजू खान (शाखा क्र. 19, 20) यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर शाखाप्रमुखपदी निखिल गुडेकर (शाखा क्र. 19), श्याम मोरे (शाखा क्र. 21), मनोज मोहिते (शाखा क्र. 22), संजय मांजरे (शाखा क्र. 23), आमिरउद्दीन तालुकदार (शाखा क्र. 33), विकास दसपुते (शाखा क्र. 34), संतोष शेट्टी (शाखा क्र. 48) यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. शाखा समन्वयकपदी अशोक गावकर (शाखा क्र. 19, 20), सत्यवान वाणी (शाखा क्र. 21, 22) तर उत्तर भारतीय प्रमुखपदी कमलेश यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मालाड विभानसभा

विधानसभा संघटकपदी गीता भंडारी (शाखा क्र. 32, 33, 48, 49), मीना करांडे (शाखा क्र. 34, 35, 46, 47) यांची तर विधानसभा समन्वयकपदी लीना केणी (शाखा क्र. 46, 47) यांची नियुक्ती करण्यात आल्याचे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या