मुसळधार पावसातही जनसेवेसाठी तत्पर, कर्तव्यदक्ष पोलिसांना शिवसेनेचा सलाम

धो धो पावसामुळे सोमवारी मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र माटुंगा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी पाण्यात अडकलेल्या डॉन बॉस्को शाळेतील मुलांची सुखरूप सुटका केली. या पार्श्वभूमीवर शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षातर्फे या कर्तव्यदक्ष पोलिसांचा सत्कार करण्यात आला.

मुंबईत सोमवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे डॉन बॉस्को शाळेने त्यांच्या पूर्व प्राथमिक शाळेची मुले स्पूल बसने घरी पाठवली. परंतु माटुंग्यात प्रचंड प्रमाणात पाणी साचल्यामुळे स्पूल बस बंद पडली. माटुंगा पोलीस ठाण्यामधील अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱयांनी या मुलांची पाण्यातून सुटका केली आणि सगळय़ांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले. या पार्श्वभूमीवर शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या शीव विधानसभेने माटुंगा पोलीस ठाण्याला भेट दिली. यावेळी शिवसेनेचे शीव विधानसभा प्रमुख गोपाळ शेलार यांच्या हस्ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार यांचा सत्कार करण्यात आला.  यावेळी उपविभागप्रमुख, कक्षाचे सचिव राजेश पुचिक, शाखाप्रमुख विनोद मोरे, कक्ष विधानसभा संघटक सुशीलपुमार सुंकी, महेश बिरवटकर, सचिन साठे, राजेंद्रप्रसाद कोंडा उपस्थित होते.