
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची अंगिकृत संघटना शिव विधी व न्याय सेनेच्या वतीने शिवसेना भवनात 4 जुलै रोजी आमदार अनिल परब यांच्या हस्ते मोफत कायदेशीर सल्ला केंद्राचे उद्घाटन झाले. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष (प्रभारी) ॲड.स्वप्ना कोदे, चिटणीस ॲड. सुमित घाग, चिटणीस ॲड. दर्शना जोगदनकर, समन्वयक ॲड.भूषण मेंगडे, जिल्हाध्यक्ष (पश्चिम महाराष्ट्र) ॲड. कोजल कदम, कोकण गोवा सचिव ॲड.ॠता कोळी, ॲड.शितल मोहिले, ॲड.सोपान बुलबुले, यांच्यासह धारावी विधानसभेच्या विभाग समन्वयक माया जाधव, शाखा संघटिका अंजना अहिरे, उपशाखाप्रमुख मीना पाटील यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. या सल्ला केंद्रात संघटनेच्या वतीने शिवसेनाभवनमध्ये ३ ऱ्या मजल्यावर दर शनिवारी संध्याकाळी ५ ते ७ या वेळेत वकील पदाधिकारी बसणार आहेत.