
मुंबईत प्रचंड वाढलेल्या प्रदूषणाला बांधकामांमधून येणारी धूळ सर्वाधिक कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. हवेतील धुळीमुळे प्रत्येक मुंबईकर श्वसनाच्या आजाराने त्रस्त आहे. असे असताना ‘मिंधे’ सरकारने मात्र कंत्राटदार मित्रांच्या फायद्यासाठी एक हजार टँकर आणि स्मॉग मशीनच्या खरेदीचा घाट घातला आहे. मात्र केवळ रस्ते धुऊन आणि स्मॉग मशीन लावून लोकांना फायदा होणार नाही. त्यामुळे हिंमत असेल तर धूळ निर्माण करणाऱया कंत्राटदार, बिल्डरांची कामे 15 दिवसांसाठी थांबवून दाखवा, असे थेट आव्हान आज शिवसेना नेते-युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी मिंधे सरकारला दिले.
आदित्य ठाकरे यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी पत्रकार परिषद घेत बेजबाबदार मिंधे सरकारचा प्रदूषणाबाबतचा हलगर्जीपणा आणि पालिकेतील घोटाळय़ांची पोलखोल केली. मुंबईत वाढलेल्या प्रदूषणामुळे राज्य सरकार आणि पालिकेने प्रदूषण नियंत्रणासाठी नियमावली काढून अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत, मात्र मुंबईत कुठल्याही साइटवर प्रदूषण नियंत्रणाचे नियम पाळले जात नसल्याचे समोर आले आहे. मिंधे सरकारच्या आशीर्वादामुळे कंत्राटदार, बिल्डरांचा बेजबाबदारपणा सुरू आहे. बीकेसीसह मुंबईत अनेक ठिकाणी सुरू असलेल्या बेसुमार बांधकामांच्या ठिकाणी प्रदूषण नियंत्रणासाठी कोणतीही खबरदारी घेतली जात नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. बांधकामे उघडय़ावर सुरू आहेत, प्रिंक्लर नाहीत. त्यामुळे जनतेची कामे थांबवण्यापेक्षा मुंबईतील बांधकामे थांबवण्याची हिंमत सरकारने दाखवावी, असे आव्हान त्यांनी दिले. मात्र मुंबईचे पालकमंत्रीच बिल्डर असल्याने हे शक्य होणार का, असा सवालही त्यांनी यावेळी केला. प्रदूषण थांबवायचे असेल तर ‘सोर्स’ला टार्गेट करा, असेही ते म्हणाले.
क्लायमेट अॅक्शन प्लॅन का गुंडाळला?
राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना आम्ही ‘आरे’त 808 एकर जंगल जाहीर केले. अर्बन फॉरेस्ट, इलेक्ट्रिक वाहने अशा धोरणांच्या अंमलबजावणीला सुरुवात केली. पालिकेच्या माध्यमातून ‘क्लायमेट अॅक्शन प्लॅन’ आखला. मात्र मिंधे सरकारने जाणीवपूर्वक हे सर्व उपक्रम मिंधे सरकारने गुंडाळल्याचा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला. याबाबत प्रश्न उपस्थित केले असता सरकारकडून कुणी उत्तरही देत नाही. कारण सरकारमध्ये पर्यावरणमंत्रीच नाही. उत्तरे दिलीच तर ती खोटी असतात, असा टोलाही त्यांनी लगावला. आमचे सरकार असतानाही मुंबईत सर्व कामे सुरू होती. मात्र सर्व कामे नियोजनबद्ध पद्धतीने सुरू होती, असेही त्यांनी स्पष्ट केले. आताची स्थिती अकार्यक्षम नगरविकासमंत्र्यांमुळे निर्माण झाली आहे.महाविकास आघाडीचे सरकार येणारच!
राज्यात सध्या महाविकास आघाडीसाठी पोषक वातावरण आहे. आमचे सरकार येणार आहे. त्यावेळी प्रशासकाच्या कालावधीत सरकारच्या आशीर्वादाने झालेल्या घोटाळय़ांची सखोल चौकशी करण्यात येईल. यामध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यांना जेलमध्ये पाठवणार असल्याचा इशाराही आदित्य ठाकरे यांनी दिला. अधिकारी-पंत्राटदारांनी चुकीचे काम केले असेल तर कारवाई नक्कीच होणार, असेही ते म्हणाले. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना घोटाळा करण्यासाठी प्रशासकाकडून होणारी मदत योग्य नसल्याचेही ते म्हणाले. कर्नाटकमध्ये भ्रष्ट सरकार बदलले. मध्य प्रदेशमध्येही भ्रष्ट सरकार घालवणार आणि महाराष्ट्रातील घटनाबाह्य खोके सरकार जनता घालवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आम्ही उघड केलेल्या घोटाळय़ांचे श्रेय भाजपचे माजी नगरसेवक, आमदार घेण्याचा प्रयत्न करतात. त्यांना हिंमत असेल तर सरकारचा पाठिंबा काढून दाखवावा, असे आव्हानही आदित्य ठाकरे यांनी दिले.
मार्चच्या गाइडलाइनचे काय झाले?
प्रदूषणाच्या नावाखाली मार्चमध्येदेखील पालिकेने अशीच गाइडलाइन जाहीर केली, मात्र याची कोणत्याही प्रकारे अंमबजावणी झाली नाही. असे असताना आता पुन्हा गाइडलाइन का काढली, मार्चच्या गाइडलाइनचे काय झाले, असा सवालही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. नियमावली जाहीर करायची, बैठका घेतल्याचे दाखवायचे, मात्र कार्यवाही काहीच नाही असा प्रकार सुरू असल्याचे ते म्हणाले.
मुंबईत 400 किमीच्या रस्त्यांच्या कामात 6 हजार 80 कोटींचा घोटाळा झाल्याचे जाहीर केल्यानंतर आता दक्षिण मुंबईत 1600 कोटींचे कंत्राट दिलेल्या पंत्राटदाराला बाद करण्यात आले आहे. रस्ते कामात घोटाळा झाल्याचे आपण 11 महिन्यांपासून सांगत आहोत. पंत्राट दिलेल्या उपनगरातील कंत्राटदारांनीदेखील कामे सुरू केलेली नाहीत. काही ठिकाणी केवळ खोदकाम करून बॅरिकेड्स लावून ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबईकरांना नाहक मनःस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे इतर चारही कंत्राटदारांना काळय़ा यादीत टाका, अशी मागणी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केली.
दंड करता की दंडवत घालता!
रस्ते काम रखडवणाऱया कंत्राटदाराला दंड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, मात्र हा दंड पंत्राटदाराला कामाची रक्कम देताना त्यातून कापून घेतला जाणार आहे. म्हणजे मुंबईकरांच्या पैशातूनच हा दंड देणार. म्हणजे दंड करणार की पंत्राटदाराला दंडवत घालणार, असा सणसणीत टोलाही त्यांनी पालिकेला लगावला.
बोगस कंत्राटदार
मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण येथे काम सुरू असताना पूल कोसळण्याची घटना घडली. हे काम करणाऱया कंत्राटदारालाच मुंबईत रस्त्याचे काम देण्यात आल्याचा गौप्यस्पह्टही आदित्य ठाकरे यांनी केला. त्यामुळे संबंधित कंत्राटदारामुळे रस्त्याचे निकृष्ट काम झाल्यास जबाबदार कोण, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
घोटाळा उघड केल्याने एक हजार कोटी वाचले
घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी दोन वर्षांत मुंबई खड्डेमुक्त करण्याची घोषणा केली. यासाठी ऑगस्ट 2022 मध्ये पाच हजार कोटींचे कॉण्ट्रक्टही दिले. मात्र मुख्यमंत्र्यांच्या मित्राच्या फायद्यासाठी हे पंत्राट रद्द करून पुन्हा जानेवारीत सहा हजार कोटींचे टेंडर काढण्यात आले. बीकेसीमधील कार्यक्रमात घाईघाईने भूमिपूजन करून वर्क ऑर्डरही दिल्या, मात्र पावसाळा संपत आला तरी अद्याप कामांना सुरुवातच झालेली नाही. शिवाय आपल्या पत्रकार परिषदेमुळे मुख्यमंत्र्यांच्या कंत्राटदार मित्राला होणारा चारशे कोटींचा फायदा आणि सहाशे कोटींच्या अॅडव्हान्सचा निर्णय रद्द झाल्याचेही ते म्हणाले. घटनाबाह्य मुख्यमंत्री खोटं बोलत असल्याचेही त्यांनी सांगितले.
आता कामे कधी होणार सांगा!
मुंबईत 1 ऑक्टोबर ते 31 मे या कालावधीत रस्त्याची कामे केली जातात. आता ऑक्टोबर गेला, नोव्हेंबर अर्धा गेला तरीदेखील कामे सुरू झालेली नाहीत. त्यामुळे पुढची कामे कोण करणार, कधी पूर्ण होणार, ही कामे नवे पंत्राटदार करणार की जुन्या कंत्राटदारांना देणार, असा सवाल करीत रस्ते काम रखडवणाऱया जबाबदार कंत्राटदार-अधिकाऱयांवर काय कारवाई करणार, असा सवालही त्यांनी केला.
दोन वर्षांत आम्ही रस्ते खड्डेमुक्त आणि काँक्रिटचे करू, अशी घोषणा घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी केली होती. ‘आज कुछ तुफानी करते है’ म्हणत खोके सरकारने कामांचा शुभारंभही केला, पण कामे कुठेही पूर्ण झालेली नाहीत. मुख्यमंत्री मुंबईकरांशी खोटं बोलले, हे आता स्पष्ट झाले आहे.

























































