
मबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या निकालात प्रभाग क्रमांक २०८ मधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे उमेदवार रमाकांत सखाराम रहाटे यांनी विजय दणदणीत मिळवला आहे. रहाटे यांनी मिंधे गटाचे उमेदवार विजय लिपारे यांना तब्बल ४,१८८ मतांच्या मोठ्या फरकाने पराभूत केले आहे.
रमाकांत रहाटे यांना ११,६५३ मते मिळाली, तर विजय लिपारे यांना ७,४६५ मते पडली. इतर उमेदवारांमध्ये काँग्रेसच्या सतीश खांडगे यांना ४,३३५ मते, अपक्ष अरुणा जैतपाल ११५ मते आणि नोटाला ४०० मते पडली.
रमाकांत रहाटे हे या प्रभागातील ज्येष्ठ नगरसेवक आहेत. २०१७ च्या बीएमसी निवडणुकीतही त्यांनी याच प्रभागातून विजय मिळवला होता आणि यंदाही त्यांनी आपली मजबूत पकड कायम राखली आहे.
घासून नाही ठासून! वॉर्ड 208 मधून शिवसेनेचे रमाकांत रहाटे विजयी pic.twitter.com/Izi5mve4fG
— Saamana Online (@SaamanaOnline) January 16, 2026





























































