
पूर्वेतील महाविद्यालयीन विद्यार्थी अर्णव खैरे याच्या आत्महत्या प्रकरणाला भाजपच्या पदाधिकारी चित्रा वाघ या राजकीय वळण देत आहेत. मध्यंतरी त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे तेढ निर्माण झाली असल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने कोळसेवाडी पोलिसांकडे करण्यात आली आहे.
शिवसेना कल्याण पूर्व विधानसभा प्रमुख नारायण पाटील आणि विभागप्रमुख किरण निचळ यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत गुरव यांना निवेदन देऊन वाघ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. याप्रसंगी शांताराम डिगे, अशोक बोयतकर, जितेंद्र कोरडे, प्रसाद भंडारी आदी उपस्थित होते. आगामी निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर राजकारण दूषित करण्याचा वाघ यांचा डाव असल्याचा आरोपही शिवसेनेने केला आहे.

























































