हिंदुस्थानला धमकी देणाऱ्या, टॅरिफ लादणाऱ्या प्रेसिडेंट ट्रम्पचे लोढा व्यावसायिक भागीदार- संजय राऊत

मगंलप्रभात लोढा हे जगातील सर्वात मोठे बिल्डर आहे, तसेच हिंदुस्थानवर टॅरिफ लादणाऱ्या आणि हिंदुस्थानला धमकावणाऱ्या प्रेसिडेंट ट्रम्पचे ते व्यावसायिक भागीदार आहेत. त्यांनी त्यांच्या मोठ्या प्रकल्पाचे नाव ट्रम्प टॉवर ठेवले आहे, त्याावर प्रतिक्रिया देताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी लोढा यांनी जबरदस्त टोला लगावला.

महाराष्ट्रातील मंत्री मंगलप्रभात लोढा हे प्रेसिडेंट ट्रम्प यांचे व्यावसायिक भागीदार आहेत. ज्या ट्रम्प यांनी आपल्या देशावर टॅरिफ लादला, जे आम्हाला धमक्या देतात त्याचे हे भागीदार आहेत. लोढा यांनी त्यांचा सर्वात मोठा जो प्रकल्प आहे, त्याल ट्रम्प टॉवर असे नाव दिले आहे. लोढा यांनी आधी हे ट्रम्प टॉवर नाव बदलावे, ते मोदी टॉवर करावे, बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने ठाकरे टॉवर करावे किंवा छत्रपती शिवाजी महाराज टॉवर करावे, त्यानंतर आम्ही त्यांच्याशी केईएम हॉस्पिटलच्या नावाबाबत चर्चा करू, असे ते म्हणाले.

मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केईएम हॉस्पिटलच्या नावातील किंग एडवर्ड हा शब्द हटवण्याची मागणी केली. तो शब्द त्यांना ब्रिटिशांचं प्रतिक वाटतो. मात्र मुंबईत हेच लोढा अमेरिकन डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाने ट्रम्प टॉवर बांधतात. लोढांनीही ट्रम्प शब्द हटवावा. यावर बोलचाना संजय राऊत यांनी आधी ट्रम्प टॉवरचे नाव बदला, केईएमचा नंतर विचार करू, असे सांगत लोढा आणि भाजपला चांगलेच फटकारले आहे.