अलिबागमध्ये भगवाच फडकणार-आदेश बांदेकर

806

महाराष्ट्राचे लाडके भावोजी आदेश बांदेकर यांनी बुधवारी रायगडमध्ये माणगाव, रोहा अलिबाग येथे दौरा केला. यावेळी माणगाव, रोहा येथे प्रचार फेरी काढली होती. अलिबाग येथे भावोजी आदेश बांदेकर यांनी महिलांशी माऊली संवाद साधला. यावेळी ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात महिला यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. महिलांचा मोठ्या प्रमाणातील प्रतिसाद पाहता अलिबाग, श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास यावेळी आदेश बांदेकर यांनी व्यक्त केला.

शिवसेना सचिव व महाराष्ट्राचे लाडके भाऊजी यांनी जिल्ह्यातील श्रीवर्धन व अलिबाग विधानसभा मतदारसंघात आज माऊली संवाद दौरा केला. सकाळच्या सत्रात माणगाव व रोहा येथे महायुतीचे उमेदवार विनोद घोसाळकर यांच्या प्रचार फेरीत सहभाग घेऊन महिलांशी संवाद साधला. सायंकाळी अलिबाग येथे महायुतीचे उमेदवार महेंद्र दळवी यांच्या प्रचारार्थ चेंढरे बायपास येथे महिलांबरोबर माऊली संवाद साधला.

अलिबाग येथे आज माऊली सांवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमात आदेश बांदकर यांनी महिलाशी संवाद साधून बोलते केले. एरवी अबोल असणार्‍या महिलांनी आपल्या लाडक्या भावोजींशी मनमुराद गप्पा मारल्या. काही झाले तरी आम्ही महेंद्र दळवी यांना विजयी करणारच. आम्ही तसा निर्धार केला आहे.असे वचन माऊलींनी आदेश बांदेकर यांना दिले.

शिवसेनेने आपल्याल काय दिले असा प्रश्‍न एक महिलेने विचारला त्याला उत्तर देताना बांदेकर म्हणाले, शिवसेनाप्रमुखांनी माणुसकीने दुसर्‍यासाठी काम करण्याचे संस्कार दिले. महिलांच्या चेहर्‍यावर आनंद, हासू आणण्यचे तसेच . आम्हा गाय आणि माय सुरक्षित ठेवण्याचे विचार दिले.

या कार्यक्रमात महिलांची उपस्थिती पाहता महेद्र दळवी विजयी होतील यात आता शंका वाटत नाही. महिलांनी एक विचाराने आपल्यात हेवेदावे न करता. गैरसमज न ठेवता. प्रलोभानांना बळी न पडता पुढील चार दिवस काम करा. महेंद्र दळवी यांना विजयी करा असे आवाहन बांदेकर यांनी उपस्थित महिलांना केले.

महेद्र दळवी यांना विजयी करून अलिबाग विधानसभा मतदारसंघात आपल्याला इतिहास घडवाचा आहे. हा इतिहास घडविण्यसाठी आपण तयार आहात का , असा प्रश्‍न आदेश बांदेकर यांनी महिलांना विचारला असता उपस्थित महिलांनी हात वर करून अलिबाग विधानसभा मतदारसंघात इतिहास घडविण्याचे वचन दिले.संवाद माऊली मेळाव्याला माजी महापौर शुभा राऊळ, संपर्क प्रमुख शीतल म्हात्रे, अनघा कानिटकर दिपश्री पोटफोडे, राजीप सदस्य मानसी दळवी या उपस्थित होत्या.

श्रीवर्धन मतदारसंघात विनोद घोसाळकर याना विजयी करा – आदेश बांदेकर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्यातील घर, घरातील प्रत्येक माणूस सुखी समाधानासाठी झटत आहेत. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे सुद्धा पायाला भिंगरी लाऊन राज्यात फिरत असून युवकांचे, महिलांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेत आहेत. श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विनोद घोसाळकर यांना प्रचंड मतदान करून विजयी करा असे आवाहन शिवसेना सचिव आदेश बांदेकर यांनी रोहा येथे प्रचार सभेत केले.

रोहा येथे महायुतीचे उमेदवार विनोद घोसाळकर यांच्या प्रचार सभेत शिवसेना सचिव आदेश बांदेकर हे उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी उपस्थित महिला आणि शिवसैनिकांना संबोधित केले.

रोहा शहरातून शिवसेनेची प्रचार फेरी काढली होती. यावेळी हजारोच्या संख्येने महिला आणि शिवसैनिक उपस्थित होते. आदेश बांदेकर यांच्या या प्रचार फेरीत महिलांचा मोठा सहभाग होता. यावेळी महायुतीचे उमेदवार विनोद घोसाळकर, जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, तालुकाप्रमुख समीर शेडगे, नगरसेवक दीपक तेंडुलकर, माजी जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, नगरसेविका सुवर्णा कर्जे यावेळी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या