उजनीच्या पाण्यासाठी शिवसेनेचा रास्ता रोको

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उजनीच्या पाण्यासह विविध मागण्यांसाठी अक्कलकोट येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन केले.

तालुक्यातील देगाव कालव्याद्वारे व एकरूप सिंचनाद्वारे तालुक्यातील तलाव भरण्यात यावेत, हिळ्ळी येथे बॅरेज उभे करून पावसाळय़ातील पाणी अडवून पंपहाऊसद्वारे तलाव भरावेत, अक्कलकोट शहराला 24 तास पाणीपुरवठा करावा, पाणी अडविण्यासाठी गाव तिथे बंधारे बांधावे या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ, जिल्हाप्रमुख अमर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना राज्य विस्तारक शरद कोळी, प्रिया बसवंती यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुकाप्रमुख आनंद बुक्कानुरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. मागण्या पूर्ण न झाल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.