शिवडीत रंगला सोहळा नारीशक्तीचा; शिवसेनेकडून ‘शिवडीभूषण’ पुरस्कार, कारसेवकांचाही सन्मान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महिलांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम करण्यासाठी भोईवाडा येथील राष्ट्रीय मिल मजदूर संघामध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘सोहळा नारीशक्तीचा’ कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद लाभला. यावेळी शिवडीभूषण पुरस्काराचे वितरण करण्यात आले. तर विभागातील कारसेवकांचाही उचित सत्कार करण्यात आला. शिवसेना शिवडी विधानसभा आणि स्व. नयना अजय चौधरी स्तनकर्क संभावना निवारण ट्रस्टच्या वतीने आणि गटनेते अजय चौधरी, विश्वस्त सिद्धेश चौधरी आणि गौरी चौधरी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमात 700 हून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या.

शिवडी विभागातील स्वकर्तृत्वावर पुढे आलेल्या, सामाजिक योगदान देणाऱया महिलांना ‘शिवडीभूषण’ पुरस्कार देण्यात आला. शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांच्या हस्ते नृत्य दिग्दर्शिका फुलवा खामकर यांना शिवडीभूषण देऊन गौरवण्यात आले. 25 हजार रोख आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी पश्चिम महाराष्ट्र समन्वयक दगडू सकपाळ, उपनेते मनोज जामसुतकर, उपनेत्या किशोरी पेडणेकर, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, शिवडी विधानसभा संघटक सुधीर साळवी, उपविभागप्रमुख पराग चव्हाण, गजानन चव्हाण, विभाग संघटक लता रहाटे, रूपाली चांदे, उपविभाग संघटक श्वेता राणे, वैभवी चव्हाण, सहविभाग संघटक दिव्या घाडीगावकर, माजी नगरसेविका सिंधू मसुरकर, श्रद्धा जाधव, माजी नगरसेवक अनिल कोकीळ, दत्ता पोंगडे, सचिन पडवळ, सर्व शाखाप्रमुख, शाखा संघटक, महिला कार्यकर्त्या आणि ट्रस्टचे कर्मचारी, पदाधिकारी उपस्थित होते.

शाखानिहाय 7 महिलांना मानाची पैठणी
शिवडी विधानसभेतील शाखानिहाय मानाच्या पैठणीचा लकी ड्रॉ काढण्यात आला. शाखा क्रमांक 194-195 सुषमा पाटील, शाखा 199 यशोदा पिसाळ, शाखा 202 पूजा मेस्त्राr, शाखा 203 च्या रूपाली मोरे, शाखा क्रमांक 204 च्या समृद्धी सोनावणे, शाखा क्रमांक 205च्या जयश्री दळवी आणि शाखा 206 च्या मंगला जोशी यांना पैठणीचे विजेते घोषित करण्यात आले. त्यांना मानाची पैठणी देण्यात आली.