कथ्थक नृत्याचे सौंदर्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> शिवानी दिनेश गोंडाळ

कथ्थक ही एक हिंदुस्थानी शास्त्रीय नृत्य शैली आहे. एखादी कथा सांगण्यासाठी या कथ्थक नृत्य प्रकाराचा वापर केला जातो. मुघल दरबार हे कथ्थक परफार्ंमग शैलीचे जन्मस्थान असे म्हटले तर वावगे ठरू नये. पूर्वी अगदी प्राचीन काळापासून महाकाव्य आणि पौराणिक कथांमधून कथा सांगण्यासाठी या नृत्याचा वापर केला जात असे. तेराव्या शतकात या नृत्याने एक वेगळे वैशिष्टय़ निर्माण केले. योग्य मेकअपची माहिती जाणून घेऊन तुम्ही कथ्थक नृत्याचे सौंदर्य खुलवू शकता.

नृत्य प्रकारासाठी लागणारी रंगभूषा ही खरे तर स्टेज किंवा टीव्ही या दोन्ही माध्यमांसाठी सारखीच असते. माध्यमांसाठी जरी वेगळी असली तरी त्यांची करण्याची पद्धत ही प्रत्येक नृत्य प्रकारची सारखी असते. त्यामुळे जर स्टेजवर हा मेकअप करायचा असेल, तर मग बेस हा कथ्थक, भरतनाटय़म, मणिपुरी, ओडिसी यांमध्ये सारखाच असतो. फक्त त्याच्या डोळय़ांच्या मेकअपमध्ये फरक असतो, तर कथकली या नृत्यासाठी मात्र संपूर्ण मेकअपच वेगळा असतो.

कथ्थक या नृत्यासाठी मेकअप करताना प्रथम क्लिजिंग, टोनिंग, मॉइश्चरायझिंग म्हणजेच सिटीएम करून घेणे. त्यानंतर प्रायमर लावून घ्यावा व लीप बाम लावून मेकअपला सुरुवात करावी. अलीकडे मेकअप फिक्सरचाही वापर करतात. फाऊंडेशन वापरल्यामुळे मेकअप जास्त काळ टिकण्यास मदत होते. त्यामुळे फाऊंडेशन लावून झाल्यावर ते स्पंज किंवा ब्युटी ब्लेंडरच्या सहाय्याने व्यवस्थित स्मज करून घ्यावे. म्हणजेच व्यवस्थित पसरवून घ्यावे. त्यावर कन्सिलर लावा. कन्सिलर लावून झाल्यावर तुम्ही पंटुरिंग करून घ्या व पंटुरिंग करून झाल्यानंतर सेटिंग पावडरने मेकअप सेट करून घ्या. मेकअप नीट सेट झाल्यावर त्यावर गरज असल्यास पॅनकेकचा वापर करा किंवा त्यानंतर आयब्रोमधील गॅप पेन्सिलने व्यवस्थित भरा.

जर आयब्रो पेन्सिलने आयब्रो करायच्या नसतील, तर डार्क आयशॅडो किंवा आयब्रोसाठी मिळणाऱया पावडरने त्याला व्यवस्थित शेप द्या व त्यानंतर दोन वेगवेगळे आयशॅडो वापरले तरीही चालतील. म्हणजे तुमचा ड्रेस जर दोन शेडमध्ये असेल तर तुम्ही दोन शेडच्या आयशॅडो वापरून आयशॅडो करू शकता किंवा ड्रेसला मॅचिंग आयशॅडो लावून झाल्यावर मधल्या भागात गोल्डन आयशॅडो लावून तुम्ही त्यावर आयलाइनर लावा. तुम्हाला दोन आयशॅडो लावणे कठीण वाटत असल्यास तुम्ही कोणताही डार्क रंग जसे की पिंक, ऑरेंज, रेड अशा रंगांनी ही आयशॅडो करू शकता. मात्र आयलाइनर लावण्याच्या अगोदर काजळ पेन्सिलने काजळ लावून घ्यावे व खालच्या डोळय़ांना प्रथम आयलाइनर लावून मग वरच्या पापण्यांवर आयलाइनर लावल्यानंतर दोन्ही आयलाइनर डोळय़ांच्या पुढून व मागून बाहेर काढावे. आयलाइनर लावताना साधारण पक्ष्याच्या चोचीप्रमाणे व त्याच्या शेपटीप्रमाणे हा साधारण शेप दिसतो. डोळय़ांची बाहेरची कडा ही थोडी लांबपर्यंत ओढली जाते, जेणेकरून डोळे मोठे दिसतील. लिपस्टिकची आऊटलाइन करून ओठांवर लिपस्टिक लावून घ्या व त्यानंतर गोल किंवा उभ्या आकाराची बिंदी लावा. हवे असल्यास बिंदीच्या खाली पांढरे ठिपके द्या. मेकअप पूर्ण झाल्यावर ड्रेसची ज्वेलरी घाला.

शिवानी दिनेश गोंडाळ
(मेकअप आर्टिस्ट)
[email protected]